अस्मितादर्श , काही क्षण , काही आठवणी ! अस्मितादर्श कार प्राध्यापक , डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि माझे दोन नंबर चे मोठे बंधू पांडुरंग डोमाजी राऊत उर्फ राऊत गुरुजी हे मारिसी कॉलेज चे वर्ग मित्र . गंगाधरजी पानतावणे पदवीत्तर शिक्षण घेऊन औरंगाबाद ला मराठी चे प्राध्यापक तर पांडुरंग राऊत पवनी ला नगरपालिका शाळेत माध्यमिक शिक्षक झाले . सामाजिक कार्य करावे ह्या विचाराने कार्य करावे या विचाराने झपाटलेल्या तरुणाचा तो काळ होता . गंगाधर पानतावणे मराठी चे प्राध्यापक , आंबेडकरी विचाराचे भाष्यकार , दलित साहित्याचे कैवारी म्हणून ख्याती प्राप्त झाले . अस्मितादर्श नियतकालिक चे संपादक म्हणून त्यांच्या विविध लेखनाने ते जेष्ठ साहित्यिक म्हणून एकूणच साहित्यिकाच्या यांची गणना झाली , त्यांनामराठी विश्वास साहित्य संमेलनच पहिला अध्यक्ष हा बहुमान सुद्धा मिळाला , देहाच्या सरकार कडून पदमश्री हा पदं पुरस्कार सुद्धा मिळाला पण त...