अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे :

भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी  सायन्स केले . बी एड , एम एड  शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले .

एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू  व्यक्तित्वाला बहर येत गेला !

कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाजिक  संस्था , कार्यकर्ते , विचारवंत , लेखक , अभ्यासक याचा घनिष्ठ संबंध आला . नागसेन मंडळ , जागृती मंडळ असे नामांकित मंडळ , धार्मिक , राजकीय विचार सरणी चे ते निस्पृह अभ्यासक बनले . स्वतः त्यांनी त्यांच्या पत्नी ना उच्च शिक्षेत  व्हावे म्हणून प्रवृत्त करून मॅट्रिक पासून  एम  ए  पर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली आणि वेळ प्रसंगी स्वतःचे पायावर उभे राहता येण्या साठी इतर डिप्लोमा कार्याला लावले , अर्धवेळ नौकरी करू दिली .

आपल्या पाठ च्या लहान भावांची जबाबदारी समजून त्यांनी त्यांच्या दोन लहान भावांना मुंबई ला घेऊन आले ,त्यांना स्वतःचे पायावर उभे राहावे म्हणून हर संभव  प्रयत्न केले , कमी आवक , जास्त खर्च , मेळ जुडेना म्हणून घरीच एक जुनी प्रेस घेऊन , प्रिंटिंग प्रेस , डीटीपी चा व्यवसाय सुरू केला , प्राध्यापकी नंतर सर्व वेळ ते स्वतः प्रेस चालविण्यात , खिळे जुळविण्यात , प्रूफ रेड़ीन्ग , शुद्ध लेखन आणि गटठे  पोहचविणे आदी कामे केली भावांना योग्य मार्गी लावून ते थांबले नाहीत तर महाविद्यालयातून बी एड , एम  एड च्या विध्यार्त्याना घडवीत गेले  त्यांना फुले , आंबेडकर , गांधी , मार्क्स  चा तुलनात्मक अभ्यास कसा करावा इथं पासून तर आज काय राजकीय पक्ष असावा येत पर्यंत त्याच्या विचाराची व्यापकता राहिली आहे .

अस्या या कुछ कर जाये वयात त्यांचा नेटिविस्ट डी डी राऊत बरोबर  परिचय झाला . आज हा परिचय ३० -३५ वर्ष जुना असला तरी तो आज केवळ परिचय राहिला नाही तर घनिष्ठ मित्रता , वैचारिक एकरूपता  झाली आहे .

८० - ९० च्या दशकात नेटिविस्ट डी डी राऊत यांनी सुरु केलेल्या  अगदी वर्ष सांगायचे झाल्यास १९८७  साला पासून मूळ भारतीय विचार मंच या वैचारिक व्यासपीठ वर वक्ता , मार्गदर्शक म्हणून जवळीक झाली . मूळ भारतीय विचार मंच चा १९९० साली पहिला अंक काढला तुथून नेटिविस्ट डी डी राऊत , प्राध्यापक  गोटे , के जि पाटील, विजय विसपुते , निरंजन पाटील , प्राध्यापक औचारमाल . जगझापे , बोराडे अशी मंडळी जमू लागली . पुढे ब्लू व्हील क्रॉस हि संस्था उभी राहिली , शाळा , सहकारी संस्था अश्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन डी डी राऊत येत तेव्हा रोज एक नवी संस्था काढणारे राऊत असे उपहासाने ज्यांच्या कडे बघितले जाई त्या राऊत बरोबर हि मंडळी हि उपहासाचा आणि टीकेला सामोरे गेली . तरीही पुढे नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार हा नव विचार घेऊन १९९२ साली १५ आगस्ट रोजी  नेटिव्ह पिपल्स पार्टी प्राद्यापक गोटे सर यांच्या घरी प्रांगणात झेंडा वंदना चा मुहूर्त साधत  नेटिविस्ट डी डी राऊत , यांचे हस्ते नारळ फोडून स्थापन केला गेला तेव्हा पासून प्राध्याक गोटे सर नेटिव्ह पीपल्स पार्टी चे सेक्रेटरी जनरल झाले ते आज सुद्धा कायम आहेत !  पक्षाला इलेकशन कमिशन , दिल्ली ला नोंदणी केली , इंडियन नेटिव्ह चार्टर नावाचे पाक्षिकं गोटे सरानी काढेल , चालविले ते संपादक , मुद्रांक, प्रकाशक  तर आहेतच शिवाय ,वजन मापे परवाना धारक संघाचे काम करीत  असताना त्यांनी सरकारी , पोलीस  , कोर्ट कसे भ्रस्ट असतात हे जवळून पाहिले आहे . कँसुमार  फोरम , माहीत अधिकार , हुमान राईट चे काम करताना त्यांना इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट , दिल्ली ने त्यांना , मानद प्राद्यापक म्हणून त्यांना सम्मानित केले आहे .

नौकरी करीत असताना त्यांनी उच्च शिक्षण कडे दुर्लक्ष केले नाही . ते शिक्षण  शास्त्रात  पी एच डी  मिळवून संधी मिळताच नागपूर विध्यापिठात प्रपाठला म्हणून नियुक्त झाले , पुढे विद्यापीठात हेड आफ द  डिपार्टमेंट म्हणून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि पुढे काही काळ ते वर्धा  गांधी इंटरनॅशनल विद्यापीठात काही काळ मानद प्राध्यापक म्हणून राहिले .

आता गोटे सर नागपूर ला स्थायिक झाले आहेत . त्यांना दोन उच्च शिक्षित मुले आहेत . कर्तृत्ववान आहेत , स्वतःच्या पायावर उभे आहेत . या वर्ष्या पासून त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना ताई नी लहान मुलांची शाळा काढलेली आहे तिथे हि मदत करून गोटे सर समाजाच्या प्रत्येक काम साठी हजर असतातच आणि ते नेटिव्ह विचार वाहून घेतलेले नव्हे संस्थापक असे असे अष्ट पैलू व्यक्तिमत्व , गुरुवर्य म्हणून   नेटिव्ह पीपल्स पार्टी , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , हिंदू धर्म सभा आदी ना लाभलेले व्यक्ती मत्व आहे , हे आमचे भाग्य आहे !

२३ नोव्हमेंबर आज त्यांचा वाढ दिवस आहे हा दिवस नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट गुरुवर्य दिवस म्हणून सह स्नेह, कृतज्ञ भावाने   अर्पण करतो !

गोटे सर आपणास दीर्घायुष्य , उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट 

Comments

Popular posts from this blog